अतुल नारायण तरवडे
भारतीय जनता पक्षाचे अधिकृत
उमेदवार
सर्वसाधारण पुरुष – ड | अ. क्र. 2
प्रिय मतदारबंधूंनो,
मी भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार – अतुल नारायण तरवडे, आपल्याप्रभागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करण्याच्या उद्देशाने आपल्यासमोर उभा आहे. प्रभागातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, ड्रेनेज व पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत करून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या आहेत.
अनेक परिसरांतील रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजवणे आणि पावसाळी समस्यांचे निरसन करून नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर केले. बुस्टर पंप बसवून पाणीपुरवठा सुधारला, ड्रेनेज सफाई व सेप्टिक टॅंक क्लिनिंगद्वारे स्वच्छ आणि सुरक्षित प्रभाग निर्माण केला.
स्वच्छता व पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण, पर्यावरणपूरक उपक्रम, तसेच महिला, युवक आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व कौशल्यविकास कार्यक्रम राबवून समाजभान जपले. आरोग्य शिबिरे, रक्तदान, नेत्रतपासणी आणि कोरोना काळात मदत करून नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो.
शासकीय योजनांचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचवून खऱ्या अर्थाने जनसेवा केली आहे. आपला विश्वास हीच माझी ताकद… चला एकत्र येऊ, “सक्षम, स्वच्छ आणि प्रगत प्रभाग” घडवूया!
वर्षे राजकीय सेवा
आयोजित कार्यक्रम
विविध विकास कामे
